सरी..
कसे मोल सांगू तुला या 'सरींचे',
मनाच्या तिजोरीत जपले कधी...
नाते असे जे तिच्या सोबतीचे
लपविले किती जे न लपले कधी..
वाsऱ्याsतुनी शांत हळुवार येते,
जणू संधी साधू', बरसतेs कधी..
मिठी चिंब ओली; ती मारुनी जाते..
धुक्या आडुनी दूर दिसतेs कधी...
जरी राहिले थेंब वेचावयाचे,
आतुर डोळ्यात टिपले कधी.. !! 1 !!
कसे मोल सांगू तुला या 'सरींचे',
मनाच्या तिजोरीत जपले कधी...
नाते असे जे तिच्या सोबतीचे
लपविले किती जे न लपले कधी..
सदा भान जपले, जरी जिवणी या
तिच्या सोबती धुंद मी होतसे...
कधी हात पसरून दाही दिशेतुन,
'आकाशगिरकी' मनी घेतसे..
जरी स्वप्न ते झाकल्या पापण्यांचे,
कळलेच ना, ते हरपले कधी... !! 2 !!
कसे मोल सांगू तुला या 'सरींचे',
मनाच्या तिजोरीत जपले कधी...
नाते असे जे तिच्या सोबतीचे
लपविले किती जे न लपले कधी..
कवी - अभिजीत अशोक मिरगे..
26/03/2020
Comments
Post a Comment