तू...
तू बाहेर पडता दव कशी बरसली,
तुला पाहून ती फुले कळी होण्या तरसली,
तुला स्पर्ष करण्यासाठी साठी,
स्पर्धा केली ग वाऱ्याने,
तुला पाहून चांदणी
दिली सोडून ताऱ्याने,
साऱ्या सृष्टी वर बघ,
कशी जादू झाली तुझी,
मीही त्यातलाच एक
सांग काय चूक माझी..
तुझ्या विचाराने मन
माझे भावनिक होते,
तुझ्या प्रेमात पडणे
जणू स्वाभाविक होते
आता रोज घडणार,
नवं नवं ग वाटतं,
तुझं प्रेमळ वागण
हवं हवं स वाटतं,
बघ एकवार सखे
माझं काळीज घेऊन,
तुझ्या जवळ राहील
तेही तुझंच होऊन....
कवी : अभिजीत मिरगे
Comments
Post a Comment